Anuradha Vipat
लहान मुलांना चिप्स, बिस्किट्स, चॉकलेट्स आणि पिझ्झा यांसारख्या जंक फूडचे व्यसन लागणे आजकाल पालकांसाठी खूप मोठी समस्या बनली आहे.
जंक फूडमुळे मुलांचे वजन अवाजवी वाढते किंवा त्यांना कुपोषण होते, तसेच त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होते.
जर तुम्ही स्वतः मुलांसमोर चिप्स, कोल्ड ड्रिंक्स किंवा फास्ट फूड खात असाल, तर मुलेही तेच मागणार. त्यामुळे आधी स्वतः निरोगी अन्न खाण्याची सवय लावा.
जंक फूड सुटण्याचा सर्वात सोपा नियम म्हणजे ते घरात न ठेवणे. 'आउट ऑफ साईट, आउट ऑफ माईंड' हा नियम वापरा.
नेहमीच्या चपातीऐवजी वेगवेगळ्या भाज्या किसून रंगीबेरंगी 'व्हेज काठी रोल' किंवा पराठे बनवा.
मुले अनेकदा चिडचिड करतात किंवा बोर झाल्यावर जंक फूड मागतात. अशा वेळी त्यांच्यासाठी निरोगी पर्याय तयार ठेवा
मुलांचे जंक फूड पूर्णपणे एका रात्रीत बंद करणे कठीण आहे. म्हणून आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा 'चीट डे' ठरवा.