Anuradha Vipat
हिवाळा सुरू होताच कडाक्याच्या थंडीमुळे घरातील खोल्या आणि फरशी खूप गार पडते, ज्यामुळे अनेकदा रूम हीटरचा वापर करावा लागतो.
मात्र, विजेचा खर्च न वाढवता काही सोप्या आणि स्मार्ट घरगुती ट्रिक्सचा वापर करून तुम्ही तुमचे घर नैसर्गिकरीत्या उबदार आणि आरामदायी ठेवू शकता.
सकाळी ऊन पडल्यावर घराचे पडदे पूर्णपणे बाजूला करा, जेणेकरून नैसर्गिक उष्णतेने खोलीतील हवा आणि भिंती गरम होतील.
सूर्यास्त होताच खिडक्यांचे जाड किंवा डबल-लेयर पडदे लावून घ्या, ज्यामुळे दिवसा साठलेली उष्णता बाहेर जाणार नाही आणि थंड हवा आत येणार नाही.
थंडीत फरशी खूप गार पडते. जमिनीवर लोकर किंवा जाड कापडाचे गालिचे अंथरल्याने पावलांना थंडी वाजत नाही आणि खोली उबदार राहते.
खिडक्या किंवा दारांच्या खालच्या फटीतून येणारी थंड हवा रोखण्यासाठी 'ड्राफ्ट स्टॉपर' किंवा गुंडाळलेला जाड टॉवेल ठेवा.
सुती चादरींऐवजी फ्लेनेल, मखमली किंवा लोकरीच्या चादरी आणि ब्लँकेट्स वापरा. झोपण्यापूर्वी बेडवर गरम पाण्याची पिशवी ठेवल्यास अंथरूण उबदार होते.