Swarali Pawar
IoT तंत्रज्ञानामुळे गोठ्यातील सर्व उपकरणं जसे सेन्सर, फॅन, दूध मोजणी यंत्र, हवामान नियंत्रण प्रणाली एकत्र जोडली जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक जनावराची हालचाल, आरोग्य आणि दूध उत्पादनाची माहिती थेट मोबाइलवर मिळते.
गायींच्या गळ्यात लावलेला सेन्सर बेल्ट त्यांच्या हालचाली, तापमान, रवंथ आणि माजाची वेळ नोंदवतो. जर जनावर आजारी असेल किंवा दूध कमी देत असेल, तर सूचना थेट मोबाइलवर मिळते.
गोठ्यातील तापमान आणि आर्द्रता मोजून फॅन आणि फॉगर आपोआप सुरू करणारे हे सेन्सर गायींना थंडावा देतात. THI प्रणालीमुळे उष्णतेचा ताण कमी होऊन दूध उत्पादन टिकून राहतं.
प्रत्येक गायीच्या कानात बसवला जाणारा RFID टॅग तिची संपूर्ण माहिती जसे जाती, आरोग्य, लसीकरण, दूध उत्पादन हे सगळं साठवतो. यामुळे गोठ्यातील प्रत्येक जनावराचं अचूक ट्रॅकिंग शक्य होतं.
ERP सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे दूध, खाद्य, खर्च, औषधं आणि उत्पादनाची माहिती जतन होते. यामुळे गोठ्याचं आर्थिक आणि तांत्रिक नियोजन अचूक होतं.
पशुपालकांसाठी विकसित ॲप्समधून जनावरांचं आरोग्य, उत्पादन आणि हवामानाचं नियोजन करता येतं. ‘फुले अमृतकाळ’ हे ॲप तापमान आणि आर्द्रतेवर आधारित पशुसल्ला देतं.
आर्टिफिशियल हीट डिटेक्टर नोज हे संगणकाधारित उपकरण गायी माजावर आल्याची लक्षणं ओळखतं. योग्य वेळेत रेतमात्रा देता येते आणि गर्भधारणेचं प्रमाण वाढतं.
मिल्किंग मशीनमुळे एकावेळी २४ गायींचं दूध काही मिनिटांत काढलं जातं. फ्लो मीटर सेन्सरद्वारे दूधाचं प्रमाण मोजलं जातं आणि नोंद आपोआप संगणकात जाते.