Ladoo Pak Tips : लाडूचा पाक बिघडलाय? टेन्शन नका घेऊ, 'या' सोप्या ट्रिक्सने लाडू पुन्हा होतील परफेक्ट!

Anuradha Vipat

साखरेचा पाक

दिवाळी फराळात बऱ्याचदा रव्याचे किंवा बुंदीचे लाडू बनवताना साखरेचा पाक चुकला की मिश्रण एकतर कडक होते किंवा खूप पातळ राहते.

Ladoo Pak Tips | agrowon

सोपे उपाय

पण अजिबात काळजी करू नका, पाक बिघडल्यास मिश्रण फेकून न देता ते पुन्हा मऊ आणि योग्य कसे करावे, याचे सोपे उपाय खालीलप्रमाणे आहेत.

Ladoo Pak Tips | agrowon

दुधाचा किंवा पाण्याचा हबका

कोरड्या झालेल्या मिश्रणावर २ ते ३ चमचे कोमट दूध किंवा कोमट पाण्याचा हबका मारा . दुधामुळे साखर लगेच मऊ पडते आणि लाडू सहज वळता येतात.

Ladoo Pak Tips | agrowon

कोमट तुपाचा वापर

जर तुम्हाला लाडू महिनाभर टिकवायचे असतील तर दूध न वापरता, २-३ चमचे शुद्ध तूप कोमट करून मिश्रणात घाला आणि व्यवस्थित चोळून घ्या. तुपामुळे मिश्रणाला छान ओलसरपणा येतो.

Ladoo Pak Tips | Agrowon

हलके गरम करणे

संपूर्ण मिश्रण एका कढईत काढून घ्या. गॅस अगदी मंद ठेवून कढई फक्त १ मिनिट कोमट करा आणि लगेच गॅस बंद करा.

Ladoo Pak Tips | agrowon

मंद गॅसवर परता

पातळ मिश्रण कढईत टाका. गॅस मंद ठेवून १ ते २ मिनिटे हलके परतून घ्या. यामुळे त्यातील पाण्याचा अंश वाफेच्या रूपाने उडून जाईल आणि मिश्रण घट्ट होईल.

Ladoo Pak Tips | agrowon

भाजलेला रवा किंवा सुके खोबरे मिसळा

जर मिश्रण थोडेच पातळ असेल, तर बाजूला एका चमच्यात थोडे तूप घेऊन २-३ चमचे बारीक रवा खमंग भाजून घ्या आणि तो या मिश्रणात गरम गरम टाका.

Ladoo Pak Tips | agrowon

Pudachi Karanji Recipe : पुडाची करंजी रेसिपी: जिभेवर विरघळणारे अचूक साट्याचे प्रमाण आणि पदर सुटण्याची सोपी पद्धत!

Pudachi Karanji Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...