Pudachi Karanji Recipe : पुडाची करंजी रेसिपी: जिभेवर विरघळणारे अचूक साट्याचे प्रमाण आणि पदर सुटण्याची सोपी पद्धत!

Anuradha Vipat

पुडाची करंजी

दिवाळीच्या फराळात साधी करंजी तर आपण नेहमीच करतो, पण पदरावर पदर सुटलेली, देखणी आणि तोंडात टाकताच विरघळणारी पुडाची करंजी म्हणजे फराळाचा राजा!

Pudachi Karanji Recipe | agrowon

पारंपरिक रेसिपी

साट्याचा योग्य वापर करून अगदी सोप्या पद्धतीने अचूक खुसखुशीत पुडाची करंजी कशी बनवायची, याची पारंपरिक रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

Pudachi Karanji Recipe | agrowon

साहित्य

मैदा,बारीक रवा,गरम तुपाचे मोहन,दूध किंवा पाणी,मीठ,तूप,कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ,सुकं खोबरं,पिठीसाखर,बारीक रवा,खसखस,वेलची-जायफळ पूड,ड्रायफ्रूट्सचे तुकडे,तूप

Pudachi Karanji Recipe | agrowon

कृती

तूप टाकून रवा, खसखस आणि ड्रायफ्रूट्स खमंग भाजून घ्या. सुके खोबरे हलके सोनेरी रंगावर कोरडेच भाजा. एका मोठ्या भांड्यात भाजलेले खोबरे, रवा, खसखस, पिठीसाखर आणि वेलची-जायफळ पूड एकत्र करून सारण बाजूला ठेवा.

Pudachi Karanji Recipe | agrowon

पीठ

परातीत मैदा, बारीक रवा, मीठ आणि कडकडीत गरम तुपाचे मोहन एकत्र करा. थोडे थोडे कोमट दूध किंवा पाणी वापरून घट्ट पीठ मळून घ्या आणि ३० मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवा.

Pudachi Karanji Recipe | agrowon

'साटा' बनवण्याची पद्धत

एका वाटीत ३ चमचे घट्ट तूप घ्या. ते हाताने किंवा चमच्याने एकाच दिशेने ५ मिनिटे छान फेटून घ्या, जोपर्यंत ते पांढरे शुभ्र आणि हलके होत नाही. आता त्यात ३ चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून पुन्हा नीट फेटून घ्या. तुमचा मऊ आणि हलका साटा तयार आहे.

Pudachi Karanji Recipe | agrowon

पुडाची लाटी तयार करणे

पिठाचे ३ समान भाग करा. प्रत्येक भागाची एक सारख्या आकाराची मोठी आणि पातळ पोळी लाटून घ्या. या तिन्ही पोळ्यांचा मिळून एक घट्ट रोल तयार करा. करताना आत हवा राहणार नाही याची काळजी घ्या. या रोलचे चाकूने अर्ध्या-अर्ध्या इंचाचे छोटे तुकडे कापून घ्या. लाटी बेलण्याने हलक्या हाताने एकाच दिशेने लाटून तिची पुरी तयार करा. या पुरीच्या मध्यभागी २ चमचे सारण भरा. तळताना करंजीवर झाऱ्याने गरम तेल उडवत राहा, यामुळे करंजीचे पुड छान मोकळे होतात.

Pudachi Karanji Recipe | agrowon

Shenachya Gavlani : दिवाळीत शेणाच्या गवळणी का मांडतात? जाणून घ्या धार्मिक रहस्य

Shenachya Gavlani | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...