Baobab Tree : जगातलं अद्भूत झाड, जे आपल्या खोडात साठवतं १२ हजार लिटरपर्यंत पाणी

Mahesh Gaikwad

वनस्पतींच्या प्रजाती

आपल्या आसपासच्या निसर्गामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, किटकांच्या प्रजाती पाहायला मिळतात. निसर्गामध्ये अशा काही वनस्पतींच्या प्रजाती आहेत, ज्या विचित्र आकार, उंचीमुळे जगभरात चर्चेचा विषय असतात.

Baobab Tree | Agrowon

बाटलीसारखा आकार

आज आम्ही तुम्हाला अशाच एका झाडाच्या प्रजातीबद्दल सांगणार आहोत, ज्याचा आकार दिसायला बाटलीसारखा असतो.

Baobab Tree | Agrowon

खोडात पाणी

तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारच्या झाडांच्या प्रजाती पाहिल्या असतील, पण तुम्ही असं झाड पाहिलंय का, जे आपल्या खोडात १२ हजार लिटर पाणी जमा करते.

Baobab Tree | Agrowon

बाओबाब झाड

या झाडाचं नाव आहे बाओबाब. याला बोआब, बोआबोआ, बॉटल वृक्ष किंवा उलटे झाड अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जाते.

Baobab Tree | Agrowon

आफ्रिकेतील झाड

बाओबाब झाडाची प्रजाती प्रामुख्याने आफ्रिकेच्या मदागास्कर येथे आढळतात. या झाडाला वर्षातील केवळ ६ महिनेच पाने लागतात.

Baobab Tree | Agrowon

३० मीटर उंची

बाओबाब झाडाची उंची तब्बल ३० मीटरपर्यंत असते. तर याचा व्यास ११ मीटरपर्यंत रुंद असतो. या झाडाची रचना फारच विचित्र असते. हे झाड पाहिले की, याची मुळे वरती आणि खोड तळाशी असल्यासारखे दिसते.

Baobab Tree | Agrowon

पिण्यासाठी पाणी

झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर या झाडाच्या खोडामध्ये हजारो लिटरपर्यंत पाणी जमा होते. पाऊस नसलेल्या भागात हे पाणी महिनोनमहिने पिण्यासाठी वापरले जाते.

Baobab Tree | Agrowon

झाडाची साल

बाओबाब झाडाच्या सालीत ४० टक्क्यांपर्यंत ओलावा असतो. त्यामुळे याचा जाळण्यासाठी उपयोग होत नाही.

Baobab Tree | Agrowon

विविध वस्तू

या झाडाच्या खोडाच्या आतील भागात तंतू असतात. ज्यापासून कपडे, दोरखंड, मासेमारीच्या जाळ्या यासारख्या वस्तू तयार केल्या जातात.

Baobab Tree | Agrowon
Ancient Festival | Agrowon