Anuradha Vipat
लहान घर दिसायला सुंदर, मोकळे आणि आकर्षक बनवण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असते.
योग्य फर्निचर आणि रंगांचा वापर करून तुम्ही तुमच्या छोट्या घराला मोठा लुक देऊ शकता.
घराच्या भिंतींना पांढरा, क्रीम, फिकट पांढरा किंवा हलका राखाडी रंग द्या.
एकापेक्षा जास्त उपयोग होणारे फर्निचर वापरा. उदा. सोफा-कम-बेड , हायड्रॉलिक स्टोरेज असलेला बेड किंवा फोल्डिंग डायनिंग टेबल.
जमिनीवर कपाट किंवा रॅक ठेवण्याऐवजी भिंतींवर फ्लोटिंग शेल्व्ह्ज किंवा उभे कपाट बनवा.
लिव्हिंग रूम किंवा हॉलच्या एका भिंतीवर मोठा आरसा लावा.
पडदे खिडकीच्या आकाराचे न लावता, थेट छतापासून जमिनीपर्यंत लांब पडतील असे लावा.