Anuradha Vipat
वर्क फ्रॉम होमकरताना एकाच जागी तासनतास बसून राहिल्याने वजन वाढणे, पाठीचे आजार आणि आळस यांसारख्या समस्या उद्भवतात.
घरात राहूनही स्वतःला फिट आणि सक्रिय ठेवण्यासाठी खालील ५ सोपे मार्ग अवलंबा.
दर १ तासाच्या कामानंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्या. या वेळेत घरातल्या घरात चाला, थोडे स्ट्रेचिंग करा किंवा मानेचे आणि पाठीचे हलके व्यायाम करा.
ऑफिसची वेळ सुरू होण्यापूर्वी किंवा काम संपल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटे व्यायामासाठी द्या.
लॅपटॉपसमोर बसून चिप्स किंवा जंक फूड खाणे टाळा. जेवणाची वेळ निश्चित ठेवा.
बेडवर किंवा सोफ्यावर बसून काम करणे पूर्णपणे टाळा. टेबल आणि पाठीला आधार देणारी खुर्ची वापरा.
स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. ऑफिसचे काम संपल्यावर लॅपटॉप बंद करा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.