Anuradha Vipat
पावसाळा सुरू झाला की अनेकांना दिवसभर आळस येणे, सतत झोप येणे आणि कामात लक्ष न लागणे यासारख्या समस्या जाणवतात.
बाहेर पावसाचा आवाज, थंड वातावरण आणि ढगाळ हवामान यामुळे झोप अधिक येते असे वाटते.
पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होते. सूर्यप्रकाशाचा शरीरातील जैविक घड्याळावर प्रभाव असतो.
मेलाटोनिन हा झोप नियंत्रित करणारा हार्मोन आहे. अंधार किंवा कमी प्रकाशात त्याचे स्रवण वाढते.
हवेत वाढलेली आर्द्रता आणि थंडावा शरीराची कार्यक्षमता काही प्रमाणात मंदावू शकतो.
पावसामुळे अनेकजण घराबाहेर पडणे, चालणे किंवा व्यायाम करणे कमी करतात.
पावसाळ्यात तळलेले, तेलकट आणि जड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. अशा पदार्थांमुळे काही लोकांना जास्त झोप.