Anuradha Vipat
झोपेत काही विशिष्ट आवाज येणे हे केवळ साधे लक्षण नसून ते शरीरातील गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.
जर घोरण्याचा आवाज खूप मोठा असेल आणि मध्येच श्वास थांबल्यासारखा वाटत असेल, तर हे 'स्लीप ॲप्निया'चे लक्षण असू शकते.
झोपेत दात खाण्याचा आवाज येणे हे अतिप्रमाणत मानसिक ताण किंवा चिंतेचे लक्षण आहे.
श्वास घेताना शिट्टीसारखा बारीक आवाज येत असेल तर ते अस्थमा किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.
झोपेत कूस बदलताना शरीरातील हाडांचा किंवा सांध्यांचा आवाज येत असेल तर ते संधिवातचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
झोपेत स्पष्ट किंवा पुटपुटल्यासारखे बोलणे हे तीव्र मानसिक थकवा, ताण किंवा 'पॅरासोमनिया' नावाच्या विकारामुळे होऊ शकते.
काही वेळा अर्धवट झोपेत असताना मेंदू पूर्णपणे शांत झालेला नसतो, त्यामुळे भास होऊ शकतात.