Anuradha Vipat
कपड्यांना वास सुटणे ही एक सामान्य समस्या आहे. ओलावा, बॅक्टेरिया किंवा चुकीच्या साठवणुकीमुळे कपड्यांना वास सुटतो
आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही फॉलो केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीचं फायदा होईल.
धुतलेले कपडे लगेच वाळत घाला. घरात वाळवत असल्यास हवेशीर जागी किंवा फॅनखाली वाळवा.
कपडे उन्हात वाळवा. सूर्यप्रकाश नैसर्गिक जंतुनाशक आहे.
वापरलेले, घामाने भिजलेले कपडे बंद कपाटात किंवा प्लास्टिक पिशवीत जास्त वेळ ठेवू नका.
कपडे धुताना डिटर्जंटसोबत व्हिनेगर घालून कपडे व्हिनेगरच्या पाण्यात सुमारे वीस मिनिटे भिजवून ठेवा
बेकिंग सोडा कपड्याच्या दुर्गंधी येणाऱ्या भागावर लावा आणि ३० मिनिटांनी नेहमीप्रमाणे धुवा.