Anuradha Vipat
तुमची झोप कायमची सुधारण्यासाठी हा 'स्लीप हायजीन चार्ट' अत्यंत प्रभावी ठरू शकतो.
दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ एकच ठेवा . यामुळे शरीराचे जैविक घड्याळ सेट होते.
झोपण्यापूर्वी तास आधी स्क्रीन पूर्णपणे बंद करा. मेलाटोनिन संप्रेरक वाढते, ज्यामुळे लवकर झोप लागते.
झोपण्यापूर्वी २ तास आधी हलके जेवण करा आणि चहा-कॉफी टाळा.पचन सुधारते आणि झोपेत अडथळे येत नाहीत.
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने स्नान किंवा पुस्तकाचे वाचन करा.स्नायू शिथिल होतात आणि मेंदूला शांती मिळते.
खोलीत पूर्ण अंधार आणि शांतता ठेवा. गाढ झोप मिळण्यास मदत होते.
सकाळी उठल्यावर किमान १५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. यामुळे रात्री लवकर झोप येण्यास मदत होते.