Anuradha Vipat
पांढरे केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होतील की नाही हे ते पांढरे होण्याच्या कारणावर अवलंबून असते.
जर केस वयपरत्वे किंवा अनुवंशिक कारणांमुळे पांढरे झाले असतील, तर ते पुन्हा नैसर्गिकरित्या काळे करणे विज्ञानानुसार सध्या तरी शक्य नाही.
व्हिटॅमिन B12, लोह , आणि कॉपरच्या कमतरतेमुळे केस पांढरे झाले असल्यास आहारात बदल करून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेतल्यास फायदा होतो
अति तणावामुळे केस अकाली पांढरे होतात. तणाव व्यवस्थापन केल्यास काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते
थायरॉईडच्या समस्यांमुळे केस पांढरे होत असतील, तर आजारावर उपचार केल्यावर केसांचा रंग सुधारू शकतो
आवळा आणि लोखंडी कढईत गरम केलेले खोबरेल तेल लावल्याने अकाली पांढरे होणारे केस थांबवता येतात
खोबरेल तेलात कढीपत्ता उकळून ते तेल लावल्याने केसांचे पोषण होते