Anuradha Vipat
झोपताना मोबाईल जवळ ठेवण्याची सवय आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत घातक ठरू शकते.
आजच्या काळात झोपताना मोबाईल जवळ ठेवण्याची सवय सामान्य झाली असली तरी त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम आहेत
मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या 'ब्लू लाइट'मुळे शरीरातील 'मेलाटोनिन' नावाच्या संप्रेरकाच्या निर्मितीत अडथळा येतो. या अडथळ्यामुळे झोप उशिरा लागते.
झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा, तणाव, डोकेदुखी आणि एकाग्रतेचा अभाव अशा मानसिक समस्या उद्भवूतात.
मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा मेंदूवर परिणाम होतो.
चार्जिंगला लावलेला मोबाईल उशीखाली किंवा अंगाजवळ ठेवल्यास तो गरम होऊन आग लागण्याचा धोका असतो.
झोपण्यापूर्वी मोबाईल फोन एअरप्लेन मोड वर ठेवा किंवा बंद करा.