Skipping Benefits : दोरीउड्या मारण्याचे फायदे: रोज स्किपिंग केल्याने शरीरात काय बदल होतात?

Anuradha Vipat

स्किपिंग

स्किपिंग हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून कमी वेळात वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

Skipping Benefits | agrowon

वजन कमी होते

दररोज फक्त १५ ते २० मिनिटे स्किपिंग केल्याने पोटाची आणि मांड्यांची चरबी कमी होण्यास मदत होते.

Skipping Benefits | Agrowon

हृदयाचे आरोग्य

यामुळे शरीरातील रक्तभिसरण वेगाने होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Skipping Benefits | agrowon

हाडे मजबूत

दोरीउड्या मारताना शरीराचा भार हाडांवर पडतो, ज्यामुळे पायांची, नडगीची आणि पाठीची हाडे मजबूत होतात.

Skipping Benefits | Agrowon

शरीराचा समतोल आणि समन्वय

स्किपिंग करताना डोळे, हात आणि पाय यांचा एकाच वेळी ताळमेळ ठेवावा लागतो. यामुळे शरीराची चपळता वाढते.

Skipping Benefits | Agrowon

मानसिक ताण

हा व्यायाम करताना शरीरात 'एंडॉर्फिन' नावाचे आनंदी संप्रेरक तयार होते. यामुळे दिवसभराचा थकवा, मानसिक ताण आणि चिंता दूर होऊन मन ताजेतवाने होते.

Skipping Benefits | Agrowon

स्टॅमिना आणि ऊर्जा

रोज स्किपिंग केल्याने शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढते.

Skipping Benefits | Agrowon

Drinking Water During Workout : व्यायामादरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य?

Drinking Water During Workout | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...