Anuradha Vipat
शरीरात पाण्याची कमतरता भासू नये आणि स्नायूंची कार्यक्षमता टिकून राहावी यासाठी व्यायामाच्या वेळी योग्य पद्धतीने पाणी पिणे गरजेचे आहे.
घामाद्वारे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने स्नायूंमध्ये पेटके येत नाहीत.
शरीरात पाण्याची पातळी व्यवस्थित असल्यास ऊर्जेची पातळी टिकून राहते. यामुळे व्यायाम करताना लवकर थकवा जाणवत नाही.
व्यायामामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. पाणी शरीराला आतून थंड ठेवण्यास आणि तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.
व्यायामाच्या दरम्यान कधीही एकाच वेळी १-२ ग्लास पाणी गटगट पिऊ नका. दर १५ ते २० मिनिटांनी फक्त २ ते ३ घोट पाणी प्या.
अतिशय थंड किंवा बर्फाचे पाणी पिणे पूर्णपणे टाळा. नेहमी माठातील किंवा सामान्य खोलीच्या तापमानाचे पाणी प्या.
एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने पोट फुगते. यामुळे व्यायाम करताना अस्वस्थता, मळमळ किंवा पोटात दुखू शकते.