Anuradha Vipat
सकाळचा नाश्ता न करणे ही आरोग्यासाठी एक मोठी चूक ठरू शकते.
जर तुम्ही नाश्ता टाळला तर शरीरावर खालील वाईट परिणाम होऊ शकतात.
रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकते.
नाश्ता न केल्यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत खूप भूक लागते. यामुळे तुम्ही दुपारी गरजेपेक्षा जास्त खाता
नाश्ता न केल्याने चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे आणि स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
पोट जास्त वेळ रिकामे राहिल्याने शरीरात ॲसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे जळजळ, गॅस आणि पित्ताचा त्रास सुरू होतो.
नियमितपणे नाश्ता टाळल्याने उच्च रक्तदाब आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.