Anuradha Vipat
त्वचा सैल पडू नये आणि ती तरुण व घट्ट राहावी यासाठी तुम्ही खालील सोप्या घरगुती टिप्स फॉलो करू शकता.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे कोमट खोबरेल तेलाने चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने मालिश करा.
कोरफडमध्ये मॅलिक ॲसिड असते, जे त्वचेची लवचिकता सुधारते. कोरफड जेल चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
अंड्यातील पांढरा भाग नैसर्गिक 'स्किन टाइटनर' म्हणून ओळखला जातो.
काकडी त्वचेला हायड्रेट करते आणि नैसर्गिक टोनर म्हणून काम करते.
त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात बदाम, अक्रोड आणि पालेभाज्यांचा समावेश करा.
'पफिंग' किंवा हसण्यासारखे सोपे व्यायाम चेहऱ्याच्या स्नायूंना मजबुती देतात, ज्यामुळे त्वचा लोंबकळत नाही.