Mahesh Gaikwad
आलुबुखारा हे विदेशी फळ असून याला सामान्यत: प्लम या नावाने ओळखतात. चवीला आंबट-गोड असणारे हे एक हंगामी फळ आहे.
भारतातील पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मु-काश्मिर आणि उत्तर प्रदेश या राज्यात काही प्रमाणात आलुबुखाराची शेती केली जाते.
हंगामी फळ असेल तरी, ड्रायफ्रूट्सप्रमाणे सुकवलेले आलुबुखारा फळ कोणत्याही सिझनमध्ये खाता येते.
आंबट-गोड चवीच्या आलुबुखारामध्ये व्हिटामिन-सी, कॅल्शिअमस मॅग्नेशिअम आणि लोह यासारखे पोषक तत्त्व असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.
बध्दकोष्ठतेशिवाय अपचन, जळजळ, पोट फुगणे यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांसाठी आलुबुखारा फळ गुणकारी आहे.
अॅनिमिया आजारामध्ये शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यासाठी आलुबुखारा फायदेशीर आहे. कारण यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते.
महिलांमधील ऑस्टिओपोरोसिसची समस्या या फळाच्या सेवनामुळे नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच नियमित सेवनामुळे हाडे बळकट होतात.
आलुबुखारामध्ये व्हिटामिन आणि खनिजांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेला ग्लो येतो. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.