Mahesh Gaikwad
आजकाल तणावमुक्त आणि निरोगी आरोग्य प्रत्येकालाच जगायचे आहे. पण बदलती जीवनशैली आणि कामाचा ताण यामुळे अनेकजण आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेले दिसतात.
वाढलेले वजन ही आजकाल सामान्य समस्या झालेली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकांना जीममध्ये जावून व्यायाम करणे जमत नाही.
अशा लोकांसाठी पॉवर योग हा सर्वोत्तम पर्याय आहे. आजकालच्या तरूणांमध्ये हा योग प्रकार चांगलाच लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे.
पॉवर योग हा असा व्यायामाचा प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी वेळात व्यायाम करून शरीराला शक्तिशाली आणि उत्साही बनवू शकता.
पॉवर योग हा व्यायामाच एक प्रकार असून यामध्ये सुर्य नमस्कारासह अन्य १२ योग आसनांचा समावेश आहे.
जीमला जावून घाम गाळण्यापेक्षा हा योग प्रकार नित्यनियमाने केल्यास शरीरामध्ये अधिक लवचिकता आणि उर्जा येते.
ज्यांना वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशांनी पॉवर योग करावा. यामुळे शरीरातील मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.
विशेष म्हणजे हा पॉवर योग दरोरज करण्याची गरज नाही. आठवड्यातून तीन ते चार दिवस केला तरही याचे चांगले परिणाम दिसू लागतात.
पॉवर योगमुळे शरीरातील घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे शरीर संतुलित राहते आणि तणाव कमी होवून तुम्ही उर्जावान राहता.