Deepak Bhandigare
सीताफळ खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो
सीताफळ हे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास उपयुक्त ठरते
सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए आणि बी६ असून, यामुळे हृदय, फुफ्फुसे आणि इतर अवयव योग्यरीत्या काम करतात, तसेच मेंदूचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते
सीताफळातील उच्च फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते
सीताफळात असणाऱ्या 'व्हिटॅमिन सी'मुळे प्रतिकारशक्ती मजबूत राहून अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव होतो
सीताफळ त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते
सीताफळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून, त्यातील ल्यूटिन हे डोळ्यांमध्ये आढळणारे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे
सीताफळ रक्तदाबासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते, याचे सेवन केल्यास हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते