Anuradha Vipat
घरात आनंद, सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी वास्तूचे नियम खूप महत्त्वाचे मानले जातात.
वास्तू दोषामुळे घरात नकारात्मकता वाढून चिडचिड, आर्थिक तंगी किंवा आजारपण येऊ शकते.
मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावा. दरवाजावर 'ॐ', 'स्वस्तिक' किंवा 'शुभ-लाभ' चे चिन्ह लावावे. तसेच उंबरठ्याची पूजा करावी.
नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात आल्याने रात्री साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि घरात सकारात्मकतेचा संचार होतो.
दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात कापूर जाळा. कापूर आणि गुग्गुळाच्या धूरामुळे घरातील वातावरण सुवासिक आणि पवित्र होते.
घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि हवा शुद्ध करण्यासाठी तुळस, मनी प्लांट, स्नेक प्लांट किंवा बांबू प्लांट यांसारखी झाडे लावा.
संध्याकाळी देवघरात गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा.