Roshan Talape
दीर्घकालीन स्क्रीन वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो, झोपेची गुणवत्ता कमी होते, आणि मानसिक ताण वाढतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
झोपण्यापूर्वी, जेवताना, किंवा व्यायाम करताना मोबाईलसह, लॅपटाॅप, टॅब टाळा.
स्मार्टफोन वापरताना त्यावर काही मिनिटांनी अलार्म सेट करा जो तुम्हाला वेळोवेळी स्क्रीन टाइमबद्दल आठवण करून देईल.
'डू नॉट डिस्टर्ब' मोडचा वापर करून अनावश्यक अॅप्स आणि सूचना बंद करा. त्यामुळे अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद होईल.
प्रत्येक डिव्हाइससाठी किंवा अॅपसाठी दिवसाची वेळ मर्यादा सेट करा.
रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास स्क्रीन वापरणे टाळा, यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. या यामुळे तुम्हाला स्क्रीनपासून दूर राहण्यास मदत मिळते.
स्मार्टफोन किंवा वेगळ्या उपकरणांचा वापर खेळण्यासाठी करु नका. मनोरंजन, खेळ तसेच छंद जपण्यासाठी स्वत:ला शारीरिक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा.
स्मार्टफोनवरील सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी विशिष्ट वेळ ठरवा आणि त्या वेळेचे पालन करा.
स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी वेगळे पर्याय शोधा, उदाहरणार्थ वाचन, व्यायाम, कला, संगीत, किंवा घरातील कामे इत्यादी गोष्टींवर भर द्या.
Brain Stress : धावपळीच्या जीवनात मेंदूवर येणाऱ्या ताणाची 'अशी' आहेत लक्षणे