Swarali Pawar
या हंगामात टोमॅटो, गाजर, मुळा, बीट, कोबी, फुलकोबी, कांदा, लसूण, मेथी, पालक आणि वाटाणा अशी अनेक पिके घेतली जातात. एक किंवा दोन पिके निवडून त्यांची शास्त्रशुद्ध लागवड करावी.
रब्बी पिकांसाठी थंड आणि समशीतोष्ण हवामान सर्वाधिक योग्य असते. जास्त थंडी, दव किंवा धुके पडल्यास किडी व रोग वाढतात, त्यामुळे उत्पादन घटते.
भुसभुशीत, सुपिक आणि चांगला निचरा असलेली मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य असते.
जमिनीचा सामू (pH) ६ ते ८ दरम्यान ठेवावा. क्षारयुक्त किंवा चिकणमातीची जमीन टाळावी.
जमिनीची खोल नांगरट करून प्रति हेक्टर २० टन शेणखत द्यावे. खरीप पिकांचे अवशेष काढून सपाट वाफे, सरी-वरंबे किंवा रुंद गादी वाफे तयार करावेत.
टोमॅटो, कोबी, फुलकोबी सरी-वरंब्यांवर लावावेत. कांदा, लसूण सपाट किंवा गादी वाफ्यावर लावावेत. वाटाणा आणि घेवडा प्रत्यक्ष बी टाकून लावावेत.
ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान दर ८-१२ दिवसांनी आणि फेब्रुवारीनंतर दर ५-८ दिवसांनी पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास मुळकुज वाढते, म्हणून ठिबक सिंचन सर्वोत्तम पर्याय आहे.
लागवडीच्या वेळी निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. उरलेले नत्र दीड महिन्याने द्यावे. पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे जस्त, लोह, मॅग्नीज यांची फवारणी करावी.
सेंद्रिय खतांचा वापर वाढवा आणि द्रवरूप खतांचा वापर ठिबकद्वारे करा. फुलोऱ्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नका. सुधारित वाण आणि आधुनिक तंत्र वापरल्यास अधिक उत्पादन मिळते.