Green Fodder: हिरवा चारा तयार करा घरच्या शेतात; ज्वारी लागवडीचे सोपे मार्गदर्शन!

Swarali Pawar

पौष्टिक आणि रुचकर चारा!

ज्वारीच्या चाऱ्यात ८ ते १० टक्के प्रथिने असतात. त्याची पाने हिरवीगार, रसाळ आणि पालेदार असल्याने जनावरे ती आवडीने खातात.

Sorghum Fodder | Agrowon

मध्यम ते भारी जमीन सर्वोत्तम!

ज्वारी पिकासाठी चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. पूर्व मशागतीवेळी प्रति हेक्टर ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट मिसळावे.

Sorghum Fodder | Agrowon

योग्य जातींची निवड

रब्बी हंगामात योग्य जातींची निवड करावी. सप्टेंबर ते ऑक्टोबर हा पेरणीसाठी योग्य काळ आहे. रूचिरा, फुले गोधन, फुले अमृता आणि मालदांडी ३५-१ या जातींची ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

Sorghum Fodder | Agrowon

बियाणे आणि बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर मिसळावे. प्रति हेक्टर सुमारे ४० किलो बि

Sorghum Fodder | Agrowon

खत व्यवस्थापन

ज्वारीसाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. अर्धे खत पेरणीवेळी आणि उर्वरित ३० दिवसांनी द्यावे.

Sorghum Fodder | Agrowon

पाणी व तण व्यवस्थापन

पहिली खुरपणी वेळेत करा आणि शेत तणविरहीत ठेवा. १० ते १२ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

Sorghum Fodder | Agrowon

कीडरोग नियंत्रण

पेरणीवेळी बियाण्यास थायोमेथोक्झाम चोळावे. तसेच क्विनॉलफॉसची दोन फवारणी करून पिकाचे संरक्षण करावे.

Sorghum Fodder | Agrowon

कापणी आणि उत्पादन

६५ ते ७० दिवसांत हिरवा चारा तयार होतो. पन्नास टक्के फुलोऱ्यावर ज्वारीची कापणी करावी. प्रती हेक्टर ५०० ते ५५० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न मिळते.

Sorghum Fodder | Agrowon

Rabi Intercropping: बागायती शेतीत रब्बीतील आंतरपीक पद्धतीने नफा दुप्पट, आंतरपिकांचे पर्याय नेमकी कोणते?

Rabi Intercropping | Agrowon
अधिक माहितीसाठी...