Swarali Pawar
पेरणीवेळी एकरी ४० किलो युरिया व ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट दिल्यास नंतर खताची गरज नसते. हरभऱ्याच्या मुळांवरील गाठी नत्र तयार करतात, त्यामुळे अतिरिक्त नत्राची आवश्यकता कमी होते.
फुलोऱ्यात २% युरिया फवारणी केल्याने झाडाची वाढ सुधारते. घाटे भरत असताना २% पोटॅशिअम नायट्रेट फवारल्यास दाणे भरघोस होतात.
हरभरा पाटाने पाणी दिल्यास मुळकुज वाढते, त्यामुळे तुषार सिंचन अधिक योग्य. पहिले पाणी ४०–४५ दिवसांनी आणि दुसरे पाणी घाटे भरताना द्यावे.
तुषार सिंचनाने पाणी ३–४ तास देणे पुरेसे असते. यामुळे हरभऱ्याचे उत्पादन ६०–६५% ने वाढू शकते.
पेरणीनंतर २०–२५ दिवसांनी पहिली कोळपणी, त्यानंतर १५–२० दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. यामुळे जमिनीतील हवा खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते.
पेरणीनंतर २४ तासांच्या आत २.५ लिटर स्टॉम्प ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उगवणीपूर्वी ही फवारणी तणांना रोखते आणि पिकाला नुकसान होत नाही.
एकरी ५ कामगंध सापळे आणि ३०–४० पक्षीथांबे लावावेत. फुलोऱ्यात निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीनची फवारणी करावी.
घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही विषाणूची फवारणी करावी. यामुळे रासायनिक औषधांशिवाय किड नियंत्रण सुरक्षितपणे करता येते.