World Water Day : पाणी हेच जीवन ; जाणून घ्या पाणी बचतीचे सोपे उपाय

Mahesh Gaikwad

पाणी हेच जीवन

पाणी हेच जीवन असे आपण म्हणतो. जर पाणीच नसेल तर मानवी जीवन कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

World Water Day | Agrowon

जल संवर्धन

त्यामुळे सर्वांनाच जल संवर्धनाचे महत्त्व माहित असायलाच पाहिजे. आज आपण असेच काही सोपे उपाय पाहणार ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होवून त्याची बचत होईल.

World Water Day | Agrowon

भाज्या-फळे धुणे

स्वयंपाक घरात भाज्या-फळे नळाखाली न धुता एका भांड्यात पाणी घेवून धुवा. भाज्या धुतल्यानंतर तेच पाणी झाडांना घाला.

World Water Day | Agrowon

भांडी घासण्यासाठी कमी पाणी वापरा

भांडी घासताना वाहत्या नळाखाली भांडी घासणे टाळा. त्याऐवजी जेवढी गरज आहे तेवढेच पाणी बादलीत घेवून भांडी घासा.

World Water Day | Agrowon

शॉवरखाली अंघोळ टाळा

अंघोळ करताना शक्यतो शॉवरखाली अंघोळ करण्याचे टाळावे. शॉवरखाली अंघोळ करताना मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्याऐवजी बादलीत पाणी घेवून अंघोळ करा.

World Water Day | Agrowon

गाड्या धुण्यासाठी पाणी कमी वापरा

चारचाकी, दुचाकी धुण्यासाठी थेट नळाला पाईप लावून पाणी वापरू नका. त्याऐवजी बादलीत लागेल तेवढेच पाणी घेवून तुम्ही गाड्या धुवू शकता.

World Water Day | Agrowon

गळक्या नळाची दुरूस्ती करा

वापर झाल्यानंतर नळ पूर्णपणे बंद करा. नळ बंद केल्यानंतरही त्यातून थेंब-थेंब पाणी गळत असेल, तर तात्काळ दुरूस्ती करून घ्या.

World Water Day | Agrowon
World Water Day | Agrowon