Team Agrowon
दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो. 'शांततेसाठी पाणी' अशी यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे.
स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे व पाण्याच्या साठ्यांच्या शाश्वत संरक्षणाकरिता कार्यरत राहणे हा या मागील उद्देश आहे.
पृथ्वीच्या सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. मात्र, यातील केवळ ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे.
उर्वरित पाणी खारे असल्याने ते पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे संपूर्ण जग पिण्याच्या पाण्यासाठी या तीन टक्के पाण्यावर अवलंबून आहे.
त्यामुळे मानवाच्या पुढील पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळेच जागतिक जल दिवसाचे महत्त्व आहे.
पहिला जल दिवस १९९३ मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून २२ मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो.
जल संवर्धनाचे महत्त्व आणि समाजात जागरुकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जलदिनाची खास संकल्पना ठरवली जाते.