Team Agrowon
शेतातील काडीकचरा, पालापाचोळा, काढणीनंतरचे पिकाचे अवशेष, पाचट, धसकट हे अनेक शेतकरी जाळून टाकतात. पण या टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून उत्तम प्रतीच कंपोस्ट खत तयार करता येतं.
कंपोस्ट खत तयार करताना सुरुवातीला न कुजणारे घटक लवकर कुजावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी एका ड्रममध्ये प्रती टन पाचटासाठी १०० किलो शेण, सेंद्रिय पदार्थ लवकर कुजवणारे जिवाणू १ किलो पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे.
दुसऱ्या ड्रममध्ये पुरेसे पाणी घेऊन प्रती टन पाचटासाठी ८ किलो युरिया आणि १० किलो सुपर फॉस्फेट मिसळून द्रावण तयार करावे. त्यानंतर उसाच्या पाचटाचे किंवा उपलब्ध असलेल्या कोणतेही सेंद्रिय पदार्थ आणि काडीकचऱ्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावेत.
खोल खड्डा करुन या तुकड्यांचा खड्ड्यात २० सेंमी जाडीचा थर द्यावा.या पाचटाच्या थरावर युरिया आणि सुपर फॉस्फेट चे तयार केलेले द्रावण शिंपडून नंतर शेणकाला आणि जिवाणूचे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात टाकावे.
त्यानंतर आवश्यकतेनूसार जास्तीचे पाणी टाकावे. जेणे करुन कंपोस्ट केलेला काडीकचरा ओला राहील. पण खड्ड्यात पाणी साठणार नाही. अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा मातीने अगर शेणाने झाकून घ्यावा म्हणजे खड्ड्यातील पाण्याचे बाष्प होऊन उडून जाणार नाही.

दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्यातील खताची चाळणी करावी. आणि गरज असेल तर पाणी टाकावे. असे केल्याने चार ते साडे चार महिन्यात चांगले कुजलेले कंपोस्ट खत तयार होते.