Water Recharge: विहिरीचं पुनर्भरण कसे करावे? पाण्याची बचत करण्याची सोपी पद्धत

Swarali Pawar

पाऊस कमी? पाणी जपण्याची वेळ!

एल निनोमुळे यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणून विहिरीचं पुनर्भरण करून पाणी साठवणं खूप गरजेचं आहे.

Water Conservation | Agrowon

पुनर्भरण म्हणजे नेमकं काय?

पावसाचं पाणी विहिरीत सोडून जमिनीत मुरवणं म्हणजे पुनर्भरण. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते.

Water Conservation | Agrowon

पाण्याचा स्रोत कुठला?

ओढा, नाला किंवा वाहून जाणारं पावसाचं पाणी वापरता येतं. हे पाणी वाया न घालवता साठवणं महत्त्वाचं आहे.

Water Conservation | Agrowon

खड्डे कसे घ्याल?

पहिला खड्डा ३×३×१ मीटर आणि दुसरा २×१.५×२ मीटर घ्या. दोन्ही खड्डे योग्य अंतरावर करून पाईपने जोडा.

Water Conservation | Agrowon

थरांची रचना महत्त्वाची

खड्ड्यात खडी, वाळू आणि विटांचा चुरा अशा थरांची मांडणी करा. यामुळे पाणी स्वच्छ गाळून विहिरीत जाते.

Water Conservation | Agrowon

पाणी गाळूनच विहिरीत सोडा

थेट गाळयुक्त पाणी विहिरीत सोडू नका. स्वच्छ पाणी गेल्याने विहीर सुरक्षित राहते.

Water Conservation | Agrowon

कोणती काळजी घ्याल?

औद्योगिक किंवा क्षारयुक्त पाणी वापरू नका. दरवर्षी गाळण यंत्रणा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

Water Conservation | Agrowon

पाणी म्हणजे भविष्यातील गुंतवणूक

विहिरीचं पुनर्भरण म्हणजे पाण्याची बचत आणि सुरक्षा. यामुळे दुष्काळातही शेतीसाठी पाणी उपलब्ध राहते.

Water Conservation | Agrowon

Vermi Composting: उन्हाळ्यात गांडूळखत वाचवा! गांडूळांची काळजी घेण्याचे सोपे उपाय

अधिक माहितीसाठी..