Vermi Composting: उन्हाळ्यात गांडूळखत वाचवा! गांडूळांची काळजी घेण्याचे सोपे उपाय

Swarali Pawar

उन्हामुळे गांडूळ मरत आहेत?

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे गांडूळांवर ताण येतो. योग्य काळजी घेतल्यास गांडूळखताचे नुकसान टाळता येते.

Heat Stress Earthworms | Agrowon

बेडला सावली द्या

गांडूळ बेडवर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नका. शेडनेट, गोणपाट किंवा पेंढ्याने आच्छादन करा.

Heat Stress Earthworms | Agrowon

योग्य ओलावा ठेवा

बेडमध्ये ४०-५०% ओलावा राखणे गरजेचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी हलकी पाण्याची फवारणी करा.

Heat Stress Earthworms | Agrowon

बेड थंड ठेवा

बेडवर ओलसर गोणपाट टाकल्याने गारवा टिकतो. पाण्याच्या बाटल्या किंवा थेंबथेंब पाणी देणे उपयोगी ठरते.

Heat Stress Earthworms | Agrowon

पाण्याचा निचरा सांभाळा

बेडमध्ये पाणी साचू देऊ नका. योग्य निचऱ्यामुळे गांडूळ गुदमरून मरत नाहीत.

Heat Stress Earthworms | Agrowon

योग्य शेण वापरा

ताजे शेण टाळा, अर्धवट कुजलेले शेण वापरा. यामुळे बेडचे तापमान नियंत्रणात राहते.

Heat Stress Earthworms | Agrowon

बेडची उंची नियंत्रणात ठेवा

गांडूळखताचा बेड ६० सेमीपेक्षा जास्त उंच करू नका. यामुळे आतमध्ये उष्णता साठत नाही.

Heat Stress Earthworms | Agrowon

संरक्षण आणि काळजी घ्या

उंदीर, मुंग्या यापासून बचावासाठी राख वापरा. तयार खत सावलीत वाळवून पुन्हा गांडूळ बेडमध्ये टाका.

Heat Stress Earthworms | Agrowon

Heat Wave Summer: उष्णतेची लाट म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि परिणाम

अधिक माहितीसाठी...