Eat Fruits : फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खाणे योग्य की आयोग्य?

sandeep Shirguppe

फळांवर मीठ आणि चाट मसाला

आपण अनेकदा फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खातो. पण, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते चांगले आहे का?

Eat Fruits | agrowon

तज्ज्ञ म्हणतात

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मीठ आणि चाट मसाला टाकून फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Eat Fruits | agrowon

गुणधर्म नष्ट होतात

फळांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. परंतु, फळांमध्ये मीठ घातल्यास त्याचे गुणधर्म नष्ट होतात.

Eat Fruits | agrowon

फळांना पाणी सुटते

कट केलेल्या फळांवर मीठ, मसाले किंवा साखर टाकल्यास फळांना पाणी सुटते. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Eat Fruits | agrowon

नैसर्गिकपणा नष्ट होतो

फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर आरोग्याला हानी पोहोचवत नाही. पण, त्यात साखर घातल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Eat Fruits | agrowon

हाय बीपीला धोका

मिठात असलेले सोडियम बीपी वाढवते आणि किडनीवरही परिणाम करते. यामुळे मीठ, साखर आणि मसाल्याशिवाय फळे खा.

Eat Fruits | agrowon

आंबट आणि गोड फळे एकत्र नकोत

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही फ्रूट चाट बनवत असाल तर आंबट आणि गोड फळे एकत्र करू नका. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Eat Fruits | agrowon

एकावेळी एक फळ

एका वेळी एक फळ खाणे चांगले आहे आणि तुम्ही फळं कट करून लगेच खा. फळं कट करून दीर्घकाळ ठेवल्यानंतर ती खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते.

Eat Fruits | agrowon
आणखी पाहा...