Anuradha Vipat
अपचन, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्टता यांसारख्या समस्या दूर करून पचन सुधारण्यासाठी खालील सोपे आणि नैसर्गिक मार्ग अत्यंत प्रभावी ठरतात.
चावून खाल्ल्याने तोंडात लाळ व्यवस्थित मिक्स होते, ज्यामुळे अन्नाचे पचन तोंडातूनच सुरू होते आणि पोटावरील ताण कमी होतो.
जेवताना किंवा जेवल्या जेवल्या लगेच भरपूर पाणी पिणे टाळा. यामुळे अन्नाचे पचन करणारे पाचक रस पातळ होतात आणि पचनक्रिया संथ होते.
आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य आणि सॅलडचे प्रमाण वाढवा.
रात्रीचे जेवण नेहमी झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्यावे. तसेच रात्री जड किंवा तेलकट खाण्याऐवजी खिचडी, सूप किंवा हलका आहार घ्यावा.
रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका किवा बसून राहू नका. जेवल्यानंतर १०-१५ मिनिटे संथ गतीने चाला.
दही आणि ताकामध्ये शरीराला फायदेशीर असणारे 'गुड बॅक्टेरिया' असतात. रोज दुपारच्या जेवणात एक ग्लास ताक किंवा वाटीभर दही खाल्ल्याने आतड्यांची पचनशक्ती कमालीची सुधारते.