Mahesh Gaikwad
आजकाल बऱ्याच तरूण-तरूणींमध्ये कोरियन स्किन रूटीनची क्रेझ आहे. चेहऱ्यावरील कोरियन ग्लोसाठी बाजारात महागडे प्रॉडक्टसही उपलब्ध आहेत.
कोरियन ग्लोसाठी सर्वात आधी संपूर्ण चेहरा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित साफ करा. त्यानंतर ऑइल बेस्ड क्लिंजरने चेहारा स्वच्छ करा.
आठवड्यातून १-२ वेळा चेहऱ्याला स्क्रबिंग करा किंवा केमिकलयुक्त एक्सफोलिएट लावून चेहऱ्यावर हलकी मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते.
केमिकलयुक्त एक्सफोलिएटमुळे चेहऱ्यावरील मेकअप अतिरिक्त घाण आणि तेल काढले जाते.
चेहऱ्याला सौम्य हायड्रेटींग टोनर लावा. यामुळे त्वचेचा pH संतुलित राहतो.
कोरियन ग्लोसाठी चेहऱ्याला व्हिटामिन-सी सिरम लावा. यामुळे चेहऱ्याचा उजळपणा वाढतो.
दिवसा उन्हात बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याला सनस्क्रीन लावा. यामुळे सुर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
याशिवाय पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर नाईट क्रीम लावा यामुळे त्वचा मुलायम होते.