Mahesh Gaikwad
प्रखर सुर्यप्रकाश, धुम्रपान, पाणी कमी पिणे किंवा चुकीचे लिपबाम वापरल्यामुळे ओठ काळे पडतात.
काळे ओठ लपविण्यासाठी लिपस्टिक किंवा लिपबामचा वापर केला जातो. ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग मिळविण्यासाठी काही सोप्या टीप्स फॉलो करू शकता.
गुलाबाची पाने बारीक करून त्यांची पेस्ट करा. ही पेस्ट १५ मिनिटे ओठांवर लावून ठेवा. यामुळे ओठ नैसर्गिक गुलाबी दिसतात.
हळद आणि दूधाची पेस्ट तयार करून ५ मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका.
मध, साखर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण करून ते ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.
लिंबाच्या रसाचे १ ते २ थेंब ५-१० मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर ते धुवून टाका. हा प्रयोग नियमित केल्यास ओठ गुलाबी होतात.
दररोज २-३ वेळा गुलाब पाण्याचा स्प्रे ओठांवर मारा. यामुळे ओठ हायड्रेट राहतात आणि ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग वाढतो.
रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल बोटांनी ओठांवर लावा. यामुळे ओठ मऊ, चमकदार आणि गुलाबी राहतात.