Mahesh Gaikwad
आजकाल तरूणांमध्ये जीममध्ये जावू व्यायाम करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक तरूणांना जीममध्ये घाम गाळून फिट बॉडी करायची असते.
सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक हौशे केवळ रील बनविण्यासाठी जीममध्ये जाताना आपण पाहतो.
पण तुम्हाला हे माहित आहे का की कोणत्या वयामध्ये जीमचा व्यायाम सुरू केला पाहिजे. याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कमी वयामध्ये जीमचा व्यायाम करण्यामुळे होणारे तोटे दिर्घकाळापर्यंत जाणवू शकतात.
जीममध्ये जावून व्यायाम करण्याचे योग्य वय तुमच्या शारीरीक विकासावर अवलंबून असते.
सामान्यत: १६ वर्षे वयानंतर जीममधील व्यायाम करणे फायदेशीर आणि आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षित असते.
या वयात शरीरातील अंतर्गत संरचनां जवळजवळ संपूर्णपणे विकसित झालेल्या असतात. या वयामध्ये तुम्ही वेट ट्रेनिंग आणि हेवी वर्कआऊट करू शकता.
असे जरी असले तरी जीममध्ये ट्रेनरच्या देखरेखीखालीच व्यायाम करावा. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.