Mahesh Gaikwad
सर्दी-खोकल्यापासून संरक्षणासाठी तुम्ही काही घरच्या-घरी उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्ही सर्दी-खोकल्यासारख्या आजारापासून दूर राहाला.
नियमितपणे हात सॉनिटायझर किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवा. तसेच वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळा.
संक्रमणापासून बचावसाठी दिवसभर कोमट पाणी प्या. आले घातलेला हर्बल चहा प्या. ज्यामुळे घशाची खवखव कमी होते.
दररोजच्या आहारात व्हिटामिन-सीयुक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यामुतळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
दिवसातून एक-दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्या. ओवा किंवा पुदिन्याची वाफ घेतल्यास अधिक फायदा होईल.
दररोज किमान ७-८ तासाची झोप घ्यायलाच हवी. अपुऱ्या झोपेमुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
दररोज नियमितपणे व्यायाम करा. विशेषत: प्राणायाम, दिर्घ श्वास घेणे यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते.
सतत सर्दी-खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.