Anuradha Vipat
खोबरेल तेल ओलावा टिकवून ठेवते आणि टाळू कोरडी होण्यापासून वाचवते.
मध आणि दही दोन्ही नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझिंग करणारे आहेत आणि टाळूसाठी फायदेशीर आहेत.
कोरफड त्वचेला शांत करते आणि मॉइश्चरायझही करते.कोरफड जेल टाळूवर लावा आणि 20-30 मिनिटे तसेच ठेवून केस धुवा.
नारळ, ऑलिव्ह किंवा बदाम तेलासारखे तेल हलके गरम करून टाळूवर मालिश केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि टाळू मॉइश्चरायझ होते.
दिवसभर पुरेसे पाणी प्या. पुरेसे पाणी पिल्याने त्वचा आणि टाळू दोन्ही हायड्रेटेड राहतात.
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन ई युक्त आहार घ्या. निरोगी आहारामुळे टाळूचे आरोग्य सुधारते.
जर घरगुती उपाय करूनही कोरडेपणा कमी होत नसेल किंवा खाज जास्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.