Roshan Talape
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना वेळ देऊन, आवड ओळखून विविध क्रियाकलापांत गुंतवणे महत्त्वाचे आहे. यामुळे मोबाईलची सवय सोडवण्यास मदत मिळेल.
मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी मुलांना बाहेर खेळायला आणि फिरायला प्रोत्साहन द्या.
मोबाईल वापरासाठी ठराविक वेळ ठरवा आणि फक्त शिकण्यासाठीच द्या.
अभ्यासात रुची वाढवण्यासाठी गेमिंग आणि अॅक्टिव्हिटी-बेस्ड लर्निंगचा वापर करा.
मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी मुलांशी अधिक संवाद साधा.
मोबाईल वापर कमी केल्यावर मुलांना कौतुक करा, प्रोत्साहन द्या.
मुलांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांना त्याच्याशी संबंधित क्रियाकलापात गुंतवा.
मोबाईल कमी वापरून स्वतःचा आदर्श ठेवा, कारण मुलं पालकांचं अनुकरण करतात.
शिक्षण व मनोरंजनासाठी पुस्तकं, क्रिएटिव्ह टॉयज, विज्ञान प्रयोगसाधने व नैसर्गिक स्रोत वापरा.