Anuradha Vipat
चांदीचं पैंजण बऱ्याचं दिवस पायात घातलं की ते काळ पडतं. आज आपण घरच्या घरी तुमचं चांदीचं पैंजण कसं चमकवायचं हे पाहूयात.
लिंबू पिळून त्यात एक चमचा मीठ घालावे. या मिश्रणाने पैंजण घासून पाण्याने धुवावे.
बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट पैंजणावर लावून घासावे
टूथपेस्ट लावून पैंजण घासावे आणि पाण्याने धुवावे.
कापूर पाण्यात मिसळून पैंजण भिजवून ठेवावे. नंतर पाण्याने धुवावे.
चांदीचे क्लीनर वापरून पैंजण स्वच्छ करावे.
पांढरा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा लावून चांदीचे पैंजण या मिश्रणात दोन ते तीन तास भिजत ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा