Grain Storage Silo Technology : पोतेविरहित धान्य साठवणुकीसाठी सायलो तंत्रज्ञान

Team Agrowon

सायलो हे एक पोतेविरहित साठवणुकीचे गोदाम आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्यावर थेट प्रक्रिया केली जाते अशा यंत्रणा किंवा उद्योगांना पोतेविरहीत धान्य साठवणुकीचा सायलो हा प्रकार उपयोगात आणता येऊ शकतो. उदा. पशुखाद्य व पोल्ट्री खाद्य प्रक्रिया उद्योग.

Grain Storage Silo Technology | Agrowon

उद्योगांनी मका, सोयाबीन काढणीच्या काळात खरेदी केले की साठवणुकीसाठी पोत्यांची आवश्यकता नसते. अशा वेळेस पोतेविरहित धान्य साठवणूक करणे सोईस्कर ठरते.

Grain Storage Silo Technology | Agrowon

मोठ्या फीडमिल मार्फत शेतीमालावर प्रक्रिया करून तयार झालेले विक्रीयोग्य पशुखाद्य किंवा कोंबडीखाद्य आवश्यकतेनुसार विक्री करण्यासाठी पोत्यात भरून विक्रीपूर्वी सुरक्षित साठवणुकीसाठी सायलोचा उपयोग करतात.

Grain Storage Silo Technology | Agrowon

राज्यातील मोठ्या कृषी प्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योगांमार्फत शेतीमालाचे संकलन व प्रक्रिया केलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी सायलोचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.

Grain Storage Silo Technology | Agrowon

केंद्रीय वखार महामंडळ, राज्य वखार महामंडळ आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर सायलो साठवणुकीचा उपयोग केला जातो.

Grain Storage Silo Technology | Agrowon

सायलो ही वेगवेगळ्या आकारात बनवलेली दंडगोलाकार रचना आहे. यामध्ये धान्य साठवले जाते. ऑस्ट्रेलियामध्ये सायलो हे पारंपरिकपणे स्टील किंवा काँक्रिटपासून बनवले जातात.

Grain Storage Silo Technology | Agrowon

सामान्य प्रकारचा सायलो १० ते १८ फूट व्यास आणि ३० ते ५० फूट उंचीचा सरळ दंडगोलाकार टॉवर असतो. गंज प्रतिकारासाठी आतील पृष्ठभागासह फ्यूज्ड ग्लास किंवा पोर्सिलेन स्टीलचा वापर करतात.

Grain Storage Silo Technology | Agrowon