Anuradha Vipat
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही दिवस, तास किंवा मिनिटे आधी धोक्याचे संकेत देत असते.
छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला जडपणा, दाबल्यासारखे, घट्टपणा किंवा सुया टोचल्यासारखे दुखणे जाणवते.
छातीतील दुखणे हळूहळू डाव्या किंवा दोन्ही हातांमध्ये, खांद्यामध्ये, मानेत, पाठीच्या वरच्या भागात किंवा खालच्या जबड्यापर्यंत पसरू शकते.
कोणतेही कष्टाचे काम न करता किंवा विश्रांती घेत असतानाही श्वास अपुरा पडल्यासारखे वाटते. हे लक्षण छातीत दुखण्यापूर्वी किंवा दुखण्यासोबत दिसू शकते.
गरमी नसताना किंवा कोणताही शारीरिक व्यायाम न करता अंगाला दरदरून थंड आणि चिकट घाम फुटतो.
पुरेशी झोप घेऊनही आणि कोणतेही जड काम न करता नेहमीपेक्षा खूप जास्त थकवा किंवा अशक्तपणा वाटतो. हे लक्षण विशेषतः स्त्रियांमध्ये काही आठवडे आधी दिसू शकते.
अनेकदा पोटात गॅस झाल्यासारखे, मळमळल्यासारखे, उलटी होण्यासारखे किंवा ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ होत असल्याचा भास होतो.