Fatherhood Best Age : वडील होण्यासाठी 'परफेक्ट वय' नेमकं कोणतं?

Anuradha Vipat

सर्वात उत्तम काळ

वैद्यकीय शास्त्रानुसार वयाची २५ ते ३५ वर्षे हा वडील होण्यासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो.

Fatherhood Best Age | agrowon

"परफेक्ट वय"

मात्र, "परफेक्ट वय" ठरवताना शारीरिक आरोग्यासोबतच तुमची आर्थिक आणि मानसिक तयारी देखील तितकीच महत्त्वाची असते.

Fatherhood Best Age | agrowon

पुरुषांचेही 'बायोलॉजिकल क्लॉक'

केवळ महिलांचेच नव्हे तर पुरुषांचे वयही गर्भधारणेवर परिणाम करते. ३० वर्षांखालील पुरुषांच्या तुलनेत ४० वर्षांवरील पुरुषांकडून नैसर्गिक गर्भधारणा होण्याची शक्यता सुमारे ३०% कमी असते.

Fatherhood Best Age | agrowon

जीवनशैलीचा प्रभाव

वयापेक्षाही तुमची जीवनशैली महत्त्वाची असते. धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, अपुरी झोप आणि अति ताणतणाव यांमुळे तरुण वयातही शुक्राणूंची गुणवत्ता खालावू शकते.

Fatherhood Best Age | agrowon

मानसिक आणि आर्थिक तयारी

बाळाच्या संगोपनासाठी पुरेसा वेळ देण्याची तयारी, जोडीदारासोबतचे नाते आणि आर्थिक नियोजन पूर्ण असेल, तर वयाच्या तिशीत पालकत्व स्वीकारणे सर्वात सोयीस्कर ठरते.

Fatherhood Best Age | agrowon

३० ते ३४ वर्षे

प्रजनन क्षमता चांगली टिकून असते; शुक्राणूंमध्ये फारसा नकारात्मक बदल झालेला नसतो.

Fatherhood Best Age | agrowon

२० ते २९ वर्षे

प्रजनन क्षमता सर्वोच्च पातळीवर असते; शुक्राणूंची संख्या, गती आणि डीएनए गुणवत्ता उत्तम असते.

Fatherhood Best Age | agrowon

Raw Onion Side Effects : कच्चा कांदा रोज खाताय? तर मग हे नक्की वाचाच! शरीरावर होणारे 'हे' परिणाम तुम्हाला थक्क करतील

Raw Onion Side Effects | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...