Silage Process: चाऱ्याची टंचाई टाळायची? मुरघास ठरेल रामबाण उपाय!

Swarali Pawar

चाऱ्याची चिंता? मुरघास करा!

पाऊस कमी असल्याने पुढील काळात चाऱ्याची टंचाई जाणवू शकते. मुरघास करून वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन करता येते.

Silage Making Tips | Agrowon

मुरघासासाठी कोणता चारा?

मका, ज्वारी आणि बाजरीपासून चांगला मुरघास तयार करता येतो. मका दुधाळ दाण्याच्या अवस्थेत, तर ज्वारी-बाजरी फुलोऱ्यात कापावी.

Silage Making Tips | Agrowon

कुट्टी करून थर भरा

चाऱ्याची कुट्टी करून खड्ड्यात थराने भरावी. प्रत्येक थर चांगला दाबून हवा पूर्णपणे काढा.

Silage Making Tips | Agrowon

गुळाचे पाणी फवारा

कुट्टीवर १.५ टक्के गुळाचे पाणी आणि १ टक्का युरियाचे द्रावण फवारावे. यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होण्यास मदत होते.

Silage Making Tips | Agrowon

ओलावा योग्य ठेवा

कुट्टीमध्ये साधारण ६५ ते ७० टक्के ओलावा असणे योग्य आहे. ओलावा जास्त असल्यास कुट्टी दोन ते चार तास सुकवावी.

Silage Making Tips | Agrowon

खड्डा हवाबंद करा!

खड्डा भरल्यानंतर वर वैरणीचा थर देऊन शेण-चिखलाने किंवा पॉलिथिनने झाकावा. हवा आत गेल्यास बुरशी वाढून मुरघास खराब होऊ शकतो.

Silage Making Tips | Agrowon

४५ ते ६० दिवसांत मुरघास तयार

मुरघास तयार झाल्यानंतर दररोज लागेल तेवढाच भाग बाहेर काढा. उघडलेला भाग पुन्हा व्यवस्थित झाकून ठेवा.

Silage Making Tips | Agrowon

किती मुरघास द्याल?

दुभत्या जनावराला साधारण १६ ते २० किलो मुरघास दररोज देता येतो. सोबत ४ ते ६ किलो वाळलेला चारा आणि संतुलित आहार द्यावा.

Silage Making Tips | Agrowon

Water Stress: भाजीपाला पिकांना पाण्याच्या ताणापासून वाचवा! करा हे ७ सोपे उपाय

अधिक माहितीसाठी..