Anuradha Vipat
मुलांच्या हाडांच्या बळकट वाढीसाठी आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक खनिज आहे.
मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ, नाचणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुकामेवा हे सर्वोत्तम घरगुती उपाय आहेत.
१ वर्षापेक्षा मोठ्या मुलांच्या आहारात रोज १ ते २ ग्लास फुल क्रीम दूध, चीज आणि मऊ पनीरचा समावेश करा.
नाचणी हा कॅल्शियमचा सर्वात मोठा वनस्पतीजन्य स्त्रोत आहे. मुलांचे वजन आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी नाचणीचे सत्व, खीर, डोसा किंवा लाडू करून द्या.
पालक, ब्रोकोली आणि शेपूच्या भाजीत कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.
पांढऱ्या तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असते. तुम्ही तिळाचे लाडू, चिक्की किंवा चटणी करून मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकता.
बदाम आणि सुक्या अंजीरमध्ये भरपूर कॅल्शियम असते. रोज रात्री भिजवलेले २ बदाम सकाळी सोलून खायला द्या