Anuradha Vipat
दिवाळीच्या नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्यापूर्वी घराबाहेर डाव्या पायाच्या अंगठ्याने 'कारीट' चिरडण्याची जुनी परंपरा महाराष्ट्रात आहे.
हे केवळ एक फळ फोडणे नसून, त्यामागे असुरी वृत्तीचा नाश आणि आरोग्याचे एक मोठे पौराणिक व वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे.
पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि माता सत्यभामेने प्रजेचा छळ करणाऱ्या जुलमी नरकासूर राक्षसाचा वध केला होता. कारीट हे फळ नरकासुराचे प्रतीक मानले जाते.
पहाटे स्नानापूर्वी हे फळ डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडणे म्हणजे आपण नरकासुराचा म्हणजेच आपल्यातील दुर्गुणांचा आणि वाईट प्रवृत्तींचा अंत करत आहोत, असा याचा संकेत आहे.
कारीट चिरडल्यानंतर त्यातून निघणारा कडवट रस लोक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला आणि कपाळाला लावतात असे मानले जाते की, नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्या रक्ताचा टिळक लावला होता, हे त्याचेच प्रतीक आहे.
काही घरांमध्ये कारीट फोडल्यानंतर त्याचा अगदी छोटासा तुकडा जिभेला लावून तोंड कडू केले जाते, किंवा त्याचा रस जिभेवर ठेवला जातो. याला 'अमृतास्वाद' असे म्हणतात. दिवाळी हा आनंदाचा, गोडधोडाचा सण आहे.
आयुर्वेदानुसार, शरद ऋतू संपून जेव्हा हिवाळा सुरू होतो, तेव्हा वातावरणातील बदलांमुळे शरीरात 'पित्त' वाढण्याची शक्यता असते. कारीट हे अत्यंत कडू आणि थंड गुणधर्माचे फळ आहे.