Anuradha Vipat
हिंदू संस्कृतीत दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि आनंदाचा सण नाही, तर तो त्याग, कृतज्ञता आणि परोपकाराचा पावन काळ मानला जातो.
वास्तू शास्त्र आणि पुराणांनुसार, दिवाळीच्या दिवसांत केलेल्या दानधर्मामुळे कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात.
असे मानले जाते की आपण जे काही कमावतो, त्यातील काही हिस्सा गरजू व्यक्तीला दिल्याशिवाय धन शुद्ध होत नाही.
वास्तू शास्त्रानुसार, झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. दिवाळीच्या काळात एखाद्या मंदिरात नवीन झाडू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
दिवाळीला रस्त्यावरील लहान मुले किंवा गरजू व्यक्तींना नवीन कपडे दान करा. लाल, पिवळे किंवा इतर शुभ रंगांचे कपडे द्यावेत.
एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये मातीचे दिवे, मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप दान करा.
आपल्या घरात बनवलेला खुसखुशीत फराळ, लाडू आणि मिठाई तुमच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सुरक्षा रक्षकांना किंवा अनाथालयातील मुलांना आनंदाने वाटा.