Anuradha Vipat
व्यग्र जीवनशैलीत दिवाळीचा पारंपरिक फराळ बनवणे खूप वेळखाऊ काम वाटते. अशा वेळी इन्स्टंट दिवाळी फराळ प्रीमिक्स हा एक उत्तम पर्याय आहे.
हे प्रीमिक्स तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता आणि ऐन दिवाळीत अवघ्या १५ ते २० मिनिटांत खुसखुशीत फराळ तयार करू शकता.
तांदळाचे पीठ, डाळ्यांचेपीठ, बेसन , पांढरे तीळ,ओवा, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि गरम तेलाचे मोहन.वरील सर्व सुके जिन्नस घ्या. एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. तुमची इन्स्टंट चकली भाजणी तयार आहे.
इन्स्टंट बेसन लाडू प्रीमिक्स
जाडसर बेसन पीठ, शुद्ध तूप, पिठीसाखर, वेलची पूड, आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे तुकडे. तूप गरम करून बेसन पीठ मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्या. पीठ पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करा.
मैदा, पिठीसाखर, रवा , मीठ. मैदा, रवा, पिठीसाखर आणि मीठ एकत्र करून घ्या. हे कोरडे मिश्रण महिनाभर चांगले टिकते.
बेसन,तांदळाचे पीठ , लसूण-ओवा पूड, तिखट, हळद, चवीनुसार मीठ. सर्व पीठ आणि मसाले एकत्र करून चाळून डब्यात ठेवा.
किसलेले सुके खोबरे, पिठीसाखर, बारीक रवा, खसखस, वेलची-जायफळ पूड, तूप, आवडीनुसार चारोळी आणि मनुके. कढईत थोडे तूप टाकून रवा आणि खसखस स्वतंत्रपणे भाजून घ्या. खोबरेही हलके गरम करून घ्या. हे सर्व पूर्ण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करून हवाबंद डब्यात ठेवा.