Anuradha Vipat
वारंवार किंवा रोज केस धुणे हे दिसायला स्वच्छ वाटत असले, तरी त्याचे केसांवर काही गंभीर परिणाम होऊ शकतात.
वारंवार शॅम्पू केल्याने तेल निघून जाते आणि केस कोरडे व निर्जीव होतात.
वारंवार केस धुण्याने आणि विंचरण्याने मुळांवर ताण पडतो, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते.
केसांमधील ओलावा कमी झाल्यामुळे केसांची टोके दुभंगतात.
अतिप्रमाणात शॅम्पू वापरल्याने टाळूची त्वचा कोरडी पडते. या कोरडेपणामुळे खाज येण्याची समस्या निर्माण होते.
जर तुम्ही केसांना कलर किंवा डाय केला असेल, तर वारंवार केस धुतल्याने तो रंग लवकर फिका पडतो.
नैसर्गिक ओलावा गेल्यामुळे केस एकमेकांत जास्त अडकतात, ज्यामुळे केस विंचरताना ते जास्त तुटतात.