Anuradha Vipat
जास्त तेलकट पदार्थ चवीला चांगले लागत असले, तरी त्यांचे नियमित सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
जास्त तेलकट खाल्ल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
तेलकट पदार्थांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
जास्त तेल पचवण्यासाठी पचनसंस्थेला खूप मेहनत करावी लागते. यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोट फुगणे, अपचन आणि जुलाब होण्याचा त्रास होतो.
तेलकट पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित करू शकतात.
जास्त तेलकट खाल्ल्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसतो. यामुळे पिंपल्स, मुरुमे आणि त्वचा तेलकट होण्याचे प्रमाण वाढते.
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातील ऊर्जा वाढण्याऐवजी सुस्ती येते.